BJP National Executive Meeting : भाजपाला सर्व समाजघटकांपर्यंत पोहचवा! पंतप्रधानांचे कार्यकर्त्यांना आवाहन  

149

हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षासाठी एकच विचारधारा आहे – नेशन फर्स्ट. एकच कार्यक्रम – नेशन फर्स्ट. यावेळी पंतप्रधानांनी हैदराबादला ‘भाग्यनगर’ असे संबोधले. उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भाजपाला सर्व समाजघटकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले.

काय म्हणाले पंतप्रधान? 

हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंग यांनी जेव्हा भाजपने मुस्लिम-यादव यांची बहुसंख्या असलेली आझमगड येथील जागा भाजपने कशी जिंकली, हे सांगितले. त्यावेळी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करत पक्ष नेतृत्वाला अधिक सामाजिक समीकरणे बनवून पक्षाला दलित, मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यास सांगितले. उत्तर प्रदेश सरकारमध्ये दानिश अन्सारी हे मुस्लिम मंत्री आहेत आणि ते याच समाजातून आलेले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दलित, ठाकूर आणि यादव यांच्या मतपेटीच्या राजकारणात भाजपाने आझमगड जिंकणे याची कल्पनाही केली जात नव्हती आणि तरीही तसे झाले. आता आपल्याला विविध सामाजिक समीकरणांवर अधिक प्रयोग करावे लागतील आणि त्यावर काम करावे लागेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.