पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै रोजी (रविवारी) मन की बात कार्यक्रमामध्ये केरे कामेगौडा या व्यक्तीचा उल्लेख केला. हे कामेगौडा कोण ? ते जाणून घेऊया.
जगात काही घडू शकत, असं आपण बरेच वेळा म्हणतो आणि त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बिहारच्या दशरथ मांझीने पहाड खोदून मार्ग तयार केला होता. त्याच्यावर एक हिंदी चित्रपटही आला. अशाच चित्रपटाला साजेशी कामगिरी कामेगौडा यांची आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव त्यांनी खोदले. कामेगौडा यांचं घर कर्नाटक येथील मांड्या गावातील डासनाडोड्डीमध्ये आहे. ते मेंढपाळ असून कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढी चरवतात.
१४ तलावं एकमेकांशी जोडलेले आहेत
४० वर्षांपूर्वी ते जेव्हा मेंढ्या डोंगरावर चरायला नेत, तेव्हा तेथे जनावरांना प्यायला पाणी नसल्याचं, त्यांच्या लक्षात आलं. पहाडी जागा असल्याने तेथे पावसाचं पाणी जमा होत नसे. तेव्हा त्यांच्या डोक्यात तलाव बनवण्याची कल्पना आली. सुरुवातीला ते काठीने खड्डा खोदत. मात्र ते त्यांना कठीण जाऊ लागलं, म्हणून त्यांनी काही अवजार विकत घेण्याचं ठरवलं. नंतर त्यांनी काही मेंढ्या विकून अवजार विकत घेतले व खड्डे तयार करण्याचं काम सुरु ठेवलं. पावसाळा आला, खड्ड्यांचं रूपांतर तलावात झालं. जनावरांना पाणी मिळू लागलं, तसा कामगौडा यांचा उत्साह वाढू लागला. लोकांच्या टिंगल टवाळीकडे लक्ष न देता त्यांनी नव्या जोमाने अजून काही तलावं खोदली. त्यांनी २०१७ पर्यंत सहा तलाव बनवले होते मात्र गेल्या एक-दीड वर्षांत लोकसहभागामुळे ही संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली. त्यांनी बनवलेले १४ तलाव हे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे विशेष.
( हेही वाचा: माळढोक पक्षापाठोपाठ तणमोर पक्षाच्याही अस्तित्वाला धोका )
म्हणून मी माझे काम सुरु ठेवले
तसेच, त्यांनी डोंगरावर जवळपास २ हजार वडाची झाडं देखील लावली आहेत. त्यांना या कार्यासाठी अनेक बक्षिसे मिळाली आणि जे पैसे मिळाले ते त्यांनी पुन्हा तलावांच्या निर्मितीसाठी वापरले. केरे सांगतात, मी सुरवातीला काठीने खड्डा खोदायचो हे खूप कठीण काम होते. त्यानंतर मी माझ्या जवळील काही मेंढ्या विकून खड्डे खोदण्यासाठी अवजारे विकत घेतली, आणि काम सुरु केले. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर, जनावरांना पाणी मिळत आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी माझे काम सुरू ठेवले.
Join Our WhatsApp Community