उमेश कोल्हे हत्याकांडाला दरोड्याचे वळण देण्याचा प्रयत्न; रवी राणांचा आरोप 

143
अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच अमरावती शहराचे पोलीस आयुक्त यांनी या हत्येला दरोड्याचे वळण देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. याबाबत विधानसभेत तत्कालीन सरकारविरुद्ध आवाज उठवणार असल्याचे, रवी राणा यांनी म्हटले आहे.
अमरावती शहरातील ५४ वर्षीय केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१जून रोजी मोटारसायकल वरून आलेल्या तिघांनी गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. हत्येचे कारण स्पष्ट होत नसल्यामुळे ही हत्या लूटपाट करण्याच्या हेतूने झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. या हत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

मास्टरमाइंडसह सहा जणांना अटक

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि ती व्हॉट्सअॅप ग्रुपवरही शेअर केली. कोल्हे यांना हत्येपूर्वी कुठल्याही प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या नव्हत्या, मारेकऱ्यांनी त्यांचा माग काढत हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उदयपूर येथे झालेली हत्या आणि अमरावती या ठिकाणी झालेल्या हत्येचे कारण एकच असल्यामुळे अमरावती येथील हत्येचा तपास केंद्रीय गृहविभागाने राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) कडे सोपवण्यात आला आहे. अमरावती पोलिसांनी या हत्येप्रकरणी मास्टरमाइंडसह सात जणांना अटक केली असून, एनआयएने हा तपास हाती घेऊन आरोपीविरुद्ध  यूएपीए आणि भा.द.वी कलमाअंतर्गत  गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा ‘मी आलो आणि यांना घेऊन आलो’, फडणवीसांचा मविआला टोला )

विधानसभेत याबाबत आवाज उठवणार
२१ जून रोजी कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी या हत्येला दरोड्याचे वळण देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. ही घटना तत्कालीन सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी हत्येचे खरे कारण उघड केले नसल्याचे, रवी राणा यांनी प्रसारमध्यांमाशी बोलताना म्हटले आहे. विधानसभेत याबाबत आवाज उठवण्यात  येईल असेही राणा यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.