चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धव साहेबांना बावळट केले! गुलाबराव पाटलांनी मांडला संताप

178

शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले, उठाव झाला, पण आज काय झाले? आम्ही जेव्हा मतदारसंघात जाऊ तेव्हा बघा आमची मिरवणूक. ५ वेळा निवडून येणारे फुटतात, सत्तेतून बाहेर पडले, तरी आमची किंमत नाही. चार लोकांच्या कोंडल्याने उद्धव साहेबांना बावळट केले, ज्यांची लायकी नाही निवडून येण्याची ते आम्हाला बोलतात. आमची मते घेऊन खासदार होतात आणि आम्हाला गटारातील किडे म्हणतात. डुक्कर बोलतात, डुकराची मते घेऊन निवडून आलात. बैलांना वेश्या म्हणतात. काय शब्द वापरले, कोण हे सहन करणार?, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यातील संताप व्यक्त केला.

आम्ही काही चूक केली नाही

शिंदे गट आणि भाजपा यांच्या सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकल्यावर त्यांचे अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आमदार गुलाबराव पाटील बोलत होते. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले म्हणतात. त्यांचे चरित्र वाचा. दोन मुले त्यांच्या समोर गेली, दिघे साहेब म्हणले ‘तू आता अनाथानाचा नाथ हो’ आज दिघे साहेब आणि बाळासाहेब यांचा आत्मा आशीर्वाद देत असेल. आमचा डोळा मिळाला शिंदे आणि फडणवीस यांच्याशी. तुम्ही तुमचा पक्ष वाढवता आमचे काय म्हणणे नाही, पण आमचे घर जळते, आमचे घर उद्धवस्त करायचे का? आम्ही काही चूक केली नाही, असेही आमदार पाटील म्हणाले.

(हेही वाचा अजित पवार म्हणतात, देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार)

उद्धव साहेबांना विनंती, आजूबाजूचे कडबोळे बाजूला करा

मोदी फडणवीस यांचे आभार मानतो त्यांनी ५० आमदार असलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले. ज्या बाळासाहेबांचे नाव घेऊन आम्ही मोठे झालो त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आम्ही मोठे करणार आहोत. उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे, आजूबाजूला जे कडबोळे आहेत त्यांना बाजूला करा. जे तुम्हाला पट्टी बांधून धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहेत. त्यांना लांब करा. तुमची माणसे तुमच्यापासून दूर गेले नाहीत, त्यांना लांब केले गेले आहे. १६ राहिले आहेत, त्यातील ५-६ येतील, असेही आमदार पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.