दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – राऊतांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट, १८ जुलैला हजर राहण्याचे आदेश)
याचिका फेटाळल्यानतंर न्यायालयात धाव
सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात सिद्धार्थला गेल्या वर्षी 28 मे रोजी एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर त्याने दोनदा जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. पुढे आरोपपत्र दाखल केल्यानंतर सिद्धार्थने तिसर्यांदा जामिनासाठी याचिका केली होती. मात्र ती फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिद्धार्थने वकील अद्वैत ताम्हणकर यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला होता.
न्यायालयातील युक्तिवाद
या याचिकेत सिद्धार्थने युक्तिवाद केला की, अमली पदार्थांसारख्या अवैध तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. तर एनसीबीचे विशेष सरकारी वकील श्रीराम शिरसाट यांनी युक्तिवादात म्हटले की, त्याच्या लॅपटॉप आणि फोनवरील व्हिडिओ, इतर पुरावे आहेत तसेच सुशांत सिंह राजपूतच्या खात्यांद्वारे अमली पदार्थांच्या खरेदीशी संबंधित बँक व्यवहार आहेत.
त्यावर आपल्यावर इतर आरोपांसह नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्याच्या कलम 8(c), 20(b)(ii), 22, 27A (बेकायदेशीर वाहतूक आणि गुन्हेगारांना आश्रय देणारे), 28, 29 आणि 30 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. जामीन याचिकेत त्याने कायद्याचे कलम 27A चुकीच्या पद्धतीने त्याच्याविरुद्ध लावले असल्याचे सांगितले. हैदराबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळाल्यानंतर, त्याला एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यात त्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.
Join Our WhatsApp Community