पासपोर्ट तात्काळ हवा आहे? फॉर्म भरताना सिलेक्ट करा हा ऑप्शन, ७ दिवसात पासपोर्ट येईल घरी

123

बाहेरगावी प्रवास करण्यासाठी पासपोर्ट हे महत्वाचे ओळखपत्र असते. तुम्हालाही पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्ही आता घरबसल्या अर्ज करून पासपोर्ट काढू शकणार आहात. अनेकवेळा आपल्याला तात्काळा पासपोर्ट हवा असतो अशावेळी तुम्हाला पेमेंट पूर्वी एक ऑप्शन सिल्केट करावा लागतो. जाणून घेऊया पासपोर्टसाठी घरबसल्या Apply करण्याची संपूर्ण प्रक्रिया…

( हेही वाचा : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! सगळ्या लोकल AC होणार, पंतप्रधान कार्यालयाने दिले आदेश )

पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पासपोर्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction

या लिंकवर क्लिक करून तुम्ही पासपोर्टचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळचे पासपोर्ट ऑफिस निवडावे लागेल. यानंतर हा प्राथमिक फॉर्म तुम्ही जपून ठेवा. पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही चूक झाल्यास तुमच्या मूळ पासपोर्टमध्येही चूक होऊ शकते, त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरणे गरजेचे असते.

पासपोर्ट तात्काळ हवा असल्यास काय कराल?

तुम्हाला निर्धारित वेळेपेक्षा लवकर म्हणजेच ७ दिवसांत पासपोर्ट हवा असल्यास आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि गुन्हे नोंद नसल्याचे प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल. पेमेंट करताना तात्काळा पर्याय निवडा. सामान्य पासपोर्ट काढायला तुम्हाला १ हजार ५०० रुपये एवढे शुल्क लागते परंतु तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला एकूण ३ हजार ५०० रुपये द्यावे लागतील.

पासपोर्ट अर्ज कसा कराल?

  • पासपोर्ट सेवा केंद्राच्या www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • यामध्ये रजिस्टर करून संपूर्ण वैयक्तिक माहिती धरा.
  • आता सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट पर्याय सिलेक्ट करा. येथे तुम्हाला तात्काळा पासपोर्ट हवा असल्यास तुम्ही त्या पर्यायाची निवड करू शकता.
  • या फॉर्मची प्रिंट काढा, ही प्रिंट तुम्हाला पासपोर्ट केंद्रात जाताना घेऊन जाणे गरजेचे आहे.
  • सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तुम्हाला पासपोर्ट मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.