विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्रातील नवे शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.
(हेही वाचा आता लिखापडी बंद, थेट कार्यवाही! मुख्यमंत्री म्हणाले सिस्टीम बदलणार )
Join Our WhatsApp Community