ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव केला होता. त्यावेळेस दोन माणसं पूर्णपणे फॉर्ममध्ये होती. एक संजय राऊत आणि दुसरे आदित्य ठाकरे. संजय राऊतांनी ज्या वाईट पद्धतीने उठाव करणार्या शिवसैनिकांवर खालच्या भाषेत टिका केली (त्यात काही महिला देखील होत्या. कंगना रानौतला हरामखोर म्हणणार्या संजय राऊत यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येत नाही.) त्याच्या जवळ जाणारी भाषा अतिशय तरुण असलेल्या आदित्य ठाकरेंनी वापरली.
( हेही वाचा : यंदाच्याच वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती….पुढच्या गणेशोत्सवात शाडू मातीचीच गणेश मूर्ती)
भविष्यासाठी चिंताजनक
आदित्य ठाकरेंविषयी मनात कोणत्याही प्रकारचा आकस न ठेवता बोलावसं वाटतं की ते बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत म्हणून युवा सेना अध्यक्ष, मग आमदार आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे मंत्री होऊ शकले. आदित्य यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखवलेलं नाही. त्यांचा प्रवास आता कुठे सुरु झाला आहे. तरी देखील त्यांनी आमदारांना उल्लेखून आम्ही त्यांना हे दिलं, आम्ही त्यांना ते दिलं अशाप्रकारची भाषा वापरली, जी त्यांच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.
…म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले
आम्ही दिलं याचा अर्थ ठाकरेंनी दिलं, म्हणजे माझ्या आजोबांनी दिलं. आदित्य ठाकरे यांना वाटतं की आमदार हे कुणीतरी घरगडी आहेत आणि ते त्यांचे मालक आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अतिशय हीन बाब आहे. शिवसेना हा पक्ष आदित्य ठाकरेंना आपली प्रायव्हेट कंपनी वाटते. हा गर्व त्यांना झाला होता, म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेलेत.
आदित्य ठाकरे यांचं कर्तृत्व शून्य आहे. त्यांना जर भविष्यात खरोखरच राजकारणात काही करुन दाखवण्याची इच्छा असेल तर त्यांनी हा गर्व मोडून काढला पाहिजे. शिवसेना ही त्यांची मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र किंवा मुंबई म्हणजे ते नाहीत हे सत्य त्यांनी पचवलं पाहिजे. ते तरुण आहेत, आजच्या युगातले आहेत, इतकी समज त्यांना असायला हरकत नसावी. जर ते आता सावरले नाही, तर भविष्यात त्यांचा संजय राऊत होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community