…तर उध्दव ठाकरे यांना शिवसेना पक्ष असाही वाचवता आला असता

158

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत राज्यात भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. परंतु शिंदे यांनी आमदारांना फोडून सरकार स्थापन केले असले तरी अधिकृत शिवसेना कुणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, शिंदे फुटल्यानंतर राज्यातील सरकारही गेले आणि पक्षाचे अस्तित्वही धोक्यात आले. परंतु हे प्रकरण उध्दव ठाकरे यांनी हे प्रकरण सावधपणे हाताळले असते तर पक्षाचे अस्तित्व टिकवता आले असते आणि सरकारही राखता आले असते,अशी चर्चा सुरु असून जनतेच्या मनातील पाच कारणे आता समोर आली.

( हेही वाचा : सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी; वाहतूक संथ गतीने)

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड करत राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. परंतु सरकार बरखास्त झाल्याने शिवसेनेतील राज्यातील सरकार गेले असून आता शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी अधिकृत शिवसेना म्हणून दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आता उध्दव ठाकरे यांचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी उध्दव ठाकरे नक्की कुठे चुकले याची जनतेच्या मनातील पाच कारणे याठिकाणी देण्यात येत आहे.

उध्दव ठाकरेंना कसा वाचवता आला असता पक्ष, याची कारणे खालील प्रकरणे

  1. जर पहिल्या बंडानंतर त्वरीत सर्व आमदारांना निलंबित करून टाकले असते तर सरकार हातचे गेले असते, पण पक्ष टिकला असतात…येणाऱ्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून येणार नाही याची काळजीही घेता आली असती.
  2. जर बंडानंतर उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मागणीनुसार सरकारमधून पाय उतार झाले असते तर सरकार पडले असते आणि पक्षही टिकवता आला असता.
  3. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर बंडाची कूणकूण लागली तेव्हाच उध्दव ठाकरे यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले असते तर पक्षही टिकला असता आणि राज्यात सरकार टिकून त्याचे रिमोट उध्दव ठाकरेंना हाती ठेवता आला असता.
  4. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून उध्दव ठाकरे हे जर तुम्ही इकडे या असे आवाहन करण्याऐवजी स्वत: गुवाहाटीला शिंदे गटाला भेटण्यासाठी जात त्या सर्वांची मनधरणी करत त्यांना परत आणले असते,तरीही पक्ष टिकवता आला असता…
  5. उध्दव ठाकरे यांनी प्रकरणात संजय राऊत व आदित्य ठाकरे यांना न उतरवता स्वत:च हे प्रकरण हाताळले असते तरीही शिंदे गटावर याचा परिणाम झाला असता आणि त्यातून पक्ष फुटीरतेचे बीज तिथेच चिरडून टाकता आले असते…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.