अमेरिकेतील शिकागोच्या हायलँड पार्कमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. निक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकागोच्या डाउनटाउनमध्ये सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या परेडदरम्यान झालेल्या गोळीबारात 6 जण ठार आणि 19 जखमी झाले आहेत.
US: Multiple hurt in Highland Park shooting along July 4th parade in Illinois
Read @ANI Story | https://t.co/1CGopRadYK#IllinoisShooting #GunViolenceinUS #July4Parade pic.twitter.com/le38ozfXFB
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2022
(हेही वाचा – मुंबईत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; कोणत्या भागात काय परिस्थिती?)
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शिकागोमध्ये रक्ताने माखलेले अनेक मृतदेह ब्लँकेटने झाकलेले होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेमुळे वातावरण अतिशय दु:खी आहे. शिकागो सन- टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील परेड सकाळी 10 वाजता सुरू झाली, मात्र गोळीबार होताच 10 मिनिटांनी ती थांबवण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तर अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला. परेडला गेलेल्या शेकडोपैकी काही जण रक्ताने माखलेले दिसले. त्यांच्या खुर्च्या, मुलांचे सामान आणि ब्लँकेट तिथेच टाकून ते पळून गेले.
रिपोर्टनुसार, गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाने टेरेसवरून गोळीबार केला. शूटर एका किरकोळ दुकानाच्या छतावर चढला आणि तिथून गोळीबार सुरू केला. गोळीबारामुळे परेडमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि गोळीबार करणाऱ्याचा शोध सुरू केला.
लेक काउंटी मेजर क्राइम टास्क फोर्सचे प्रवक्ते क्रिस्टोफर कॉवेली यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, हल्लेखोराने छतावरून परेडमधील सहभागींवर रायफल गोळीबार केला आणि रायफल जप्त करण्यात आली. मात्र, त्याने कोणत्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केला हे समजू शकलेले नाही. कोवेली म्हणाले की, केवळ एका शूटरने हल्ला केला असावा असा पोलिसांचा विश्वास आहे.
Join Our WhatsApp Community