मिरा- भाईंदर शिवसेनेच्या पदाधिका-यांची यादी मातोश्री वरुन नुकतीच जाहीर झाली आहे, मात्र या यादीत दीड वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिवसैनिकाला पद देण्यात आल्याचे दिसून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय वादाच्या भोव-यात असलेल्यांनाही पदाधिका-यांच्या यादीत स्थान मिळाल्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे.
काही दिवसांपूर्वी भाईंदर पश्चिम येथील सेनेचे शहरप्रमुख पप्पू भिसे यांना सेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून शाखेतच मारहाण करण्यात आली होती. यामुळे सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरा-भाईंदरमधील सर्व पदे बरखास्त केली होती, मात्र सध्या शिवसेनेत झालेल्या उलथापालथीमुळे ठाकरे यांनी पक्षाची नव्याने बांधणी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मिरा-भाईंदरच्या पदाधिका-यांची यादी लवकरच घोषित केली जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते, मात्र नव्या निवडीबाबत स्थानिक पदाधिका-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
( हेही वाचा: शिंदे सरकार आल्यामुळे आता पुन्हा आंदोलनजीवी सक्रिय होतील? )
पदाधिका-यांमध्ये नाराजीचा सूर
सोमवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून मिरा- भाईंदरमधील पदाधिका-यांची यादी घोषित झाली आहे. या यादीनुसार जिल्हाप्रमुख म्हणून प्रभाकर म्हात्रे यांची निवड झाली आहे. मात्र पदाधिका-यांच्या या यादीवरुन आता शिवसैनिकांत तीव्र नाराजीचा सुरु उमटला आहे.
Join Our WhatsApp Community