बाईक- कार चालवणा-यांसाठी आनंदाची बातमी; नितीन गडकरींनी केली ‘ही’ घोषणा

148

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, येत्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किंमतीएवढी होईल. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. (Nitin Gadkari On Electric vehicle)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील वेगाने होणा-या प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील, त्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीची असेल. त्यामुळे आगामी काळात क्रांती होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

प्रदूषणाची पातळी कमी होईल

याशिवाय नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत उत्तर देताना सांगितले होते की स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे, लवकरच इलेक्ट्रिक इंधन सर्वत्र वापरण्यात येईल. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच नाही तर जगभरात मोठे आव्हान आहे.

( हेही वाचा: शिंदेंना यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार- फडणवीस )

हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय

यासोबतच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ‘लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणा-या स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.

जाणून घ्या खर्चात किती फरक पडेल

केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ‘याचा फायदा असा होईल की जर तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवताना हा खर्च 10 रुपयांवर येईल.’ काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन फ्युएल कार लाँच केली होती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.