अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘गुड न्युज’ दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. भाजपा सरकारच्या काळात घातलेला हा अडसर मुंडेंनी आता दूर केला आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल (1/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. वयोमर्यादा पदव्युत्तर साठी ३५ वर्षे व पीएचडी साठी ४० वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. १४ ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल (2/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
‘परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य’ हा नियम आता रद्द करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे’ असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. पदव्युत्तरसाठी वयोमर्यादा 35 वर्षे, तर पीएचडीसाठी 40 वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. 14 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतही वाढवण्यात येईल” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community