हैदराबादमध्ये भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी समिती बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीत अमित शहा यांनी तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातही भाजपाची सत्ता येईल आणि पुढची ३० – ४० वर्षे भारतीय जनता पक्षाचं युग असेल आणि भारत महासत्ता होईल असं विधान केलं.
( हेही वाचा : बाईक- कार चालवणा-यांसाठी आनंदाची बातमी; नितीन गडकरींनी केली ‘ही’ घोषणा)
कॉंग्रेसला इलेक्शन जिंकण्यात रस राहिलेला नाही
भाजपाचा चढता क्रम पाहता हे अगदीच अशक्य आहे असं वाटत नाही. पण भाजपाच्या चाहत्यांना कदाचित हे ठाऊक नसेल की आता भारतात दुसरी कॉंग्रेस उभी राहत आहे. मुळात कॉंग्रेसला इलेक्शन जिंकण्यात रस राहिलेला नाही. कॉंग्रेस म्हणजे गांधी परिवर. आता तुम्ही म्हणाल की त्यांना इलेक्शन जिंकण्यात रस का नाही? कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की भारतीय जनतेने त्यांना नाकारलेलं आहे.
मग या गांधी परिवाराचा सध्याचा अजेंडा काय आहे? तर त्यांना कॉंग्रेसचं अध्यक्षपद स्वतःजवळ ठेवायचं आहे. कारण कॉंग्रेस या पक्षाकडे खूप मालमत्ता आहे. आणि जोपर्यंत गांधी परिवारकडे कॉंग्रेसची सत्ता आहे, तोपर्यंत या मालमत्तेवर या एका परिवाराचा अधिकार असणार आहे. म्हणून कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत नाही. लोकांना प्रश्न पडलेला असतो की कॉंग्रेस सत्ता गमावतेय तरी त्यांना फरक का पडत नाही, तर याचं कारण वर मी दिलेलं आहे.
…तर या आव्हानांचा सामना करावा लागणार
आपण मगाशी दुसर्या कॉंग्रेसचा उल्लेख केला होता, ती दुसरी कॉंग्रेस म्हणजे ’आप’. आम आदमी पार्टी हा पक्ष आता हलूहळू मोठा होणार आहे. थेट देशात धडक मारण्याऐवजी त्यांनी भाजपा विरोधी राज्ये काबीज करण्याची योजना आखलेली आहे. या आपचं आव्हान भाजपासमोर आहेच. त्याचबरोर स्थनिक कौटुंबिक पक्ष देखील आपल्या कुटंबाकडे सत्ता राहावी म्हणून भाजपाच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. यांच्यासोबत भाजपाचा मुकाबला असणार आहे. भाजपाया दृष्टीकोनातून दक्षिणी राज्ये आणि बंगाल अत्यंत महत्वाचे आहेत. जर भाजपाला ३० – ४० वर्षे भारजापे युग आणायचे असेल तर या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community