परशुराम घाटात वारंवार दरळी कोसळत आहेत. हा घाट धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून घाट पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु परशुराम घाट बंद असल्याने कोकणात कसे जायचे हा प्रश्न प्रवाशांसमोर उद्भवला आहे. जाणून घ्या कोकणात जाण्याचे पर्यायी मार्ग…
( हेही वाचा : NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश )
कोकणात जाण्याचे पर्यायी मार्ग
- परशुराम घाट बंद असल्याने हलक्या वजनाच्या वाहतूकीसाठी कळंबस्ते-आंबडस-लोटे हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.
- मुंबईहून तुम्ही कोकणात जायला निघाला असाल तर मुंबई-पुणे महामार्गाने तुम्ही पुण्याला जाऊन त्यानंतर सातारा- कोल्हापूर मार्गे तळकोकणात पोहोचू शकता.
- मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणात येताना माणगावच्या पुढे आल्यावर तुम्ही फेरीबोटने दापोलीतून दाभोळ येथून गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व पुढे सिंधुदुर्ग येथेही सागरी मार्गाने प्रवास करू शकता.
- कमी वजनाची वाहतूक आंबडस – चिरणी- लोटे रस्ता – कळंबस्ते- आमडस – धामणंद या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
आठ दिवस परशुराम घाट बंद
चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या डोंगराला भेगा पडल्या आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीसोबतच परशुराम गाव आणि वस्तीतील घरांना सुद्धा धोका निर्माण झाल्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्माण घेण्यात आला आहे. यानंतर महामार्ग प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community