शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक आमदार मंगळवारी पहिल्यांदा घरी पोहोचले. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर, राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. त्यानंतर अनेक आमदार आपल्या मतदार संघात परतले. मंगळवारी रात्री उशिरा आमदार गुलाबराव पाटील जळगावात पोहोचले. त्यानंतर तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तसेच, आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचेदेखील गुलाबराव पाटलांनी आपल्या समर्थकांना बोलून दाखवले.
( हेही वाचा: संजय राऊतांवर चित्रा वाघ यांचा ट्विटर ‘वार’! )
बंडखोरी नव्हे आम्ही उठाव केला
आमदार गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी आपल्या समर्थकांना सांगितले.
Join Our WhatsApp Community