नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देणा-याला अजमेरमधून अटक

124

आरोपी सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा यांची हत्या करणा-याला बक्षिस जाहीर करत सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली होती. अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज दर्गाचे खादिम सलमान चिश्तीलाअजमेर पोलिसांनी अटक केली आहे. सलमान चिश्ती याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याविरोधात 13 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा यांची हत्या करणा-याला बक्षीस जाहीर केले होते. या व्हिडिओत तो हत्येची चिथावणी देताना नशेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

( हेही वाचा: रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट बस सुविधेसह चहा नाश्ताची व्यवस्था करा : मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश )

चिश्तीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी 

पोलिसांनी सलमान चिश्तीची कसून चौकशी सुरु केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक विकास सांगवान यांनी दिली. सलमान विरोधात 13 गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले. अजमेर पोलिसांनी चिश्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत. चिश्तीच्या घरासह त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.