नाशिकमध्ये मंगळवारी एका मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सय्यद चिश्ती असे या धर्मगुरूचे नाव असून तो सूफी बाबा म्हणून ओळखले जात होता. सय्यद चिश्ती हा अफगाणिस्तानचा नागरिक असून अनेक वर्षांपासून नाशिकच्या येवला येथे राहत होता. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणात एका संशयिताची चौकशी सुरू आहे.
(हेही वाचा – दिलखुलास एकनाथ शिंदे, एका नव्या नेतृत्वाचा उदय…)
जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
सय्यद चिश्ती हा अफगाणिस्तानचे नागरिक असल्याने त्याला स्वतःच्या नावावर जमीन खरेदी करता आली नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना सोबत घेऊन त्याने ही मालमत्ता बांधली होती. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र, पोलीस अद्याप तपास करत आहेत. हा कोणताही धार्मिक वाद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हल्लेखोरांनी डोक्यात झाडली गोळी
शहरातील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर ही हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर हल्लेखोर सुफी बाबाच्या एसयूव्हीमधून घटनास्थळावरून पळून गेले.
Join Our WhatsApp Community