RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!

154

तुम्ही वापरत असणाऱ्या नोटांची बाजारात किंमत तर आहे ना… जर अचानक तुम्हाला सांगण्यात आले की तुमच्या खिशातल्या नोटा या केवळ मातीमोल आहे तर तुम्हाला धक्का बसेल हे मात्र नक्की… कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनी नोटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तुमच्याकडे असणाऱ्या काही ठकाविक नोटांची किंमत शुन्य होणार आहे. कारण आता तुम्ही वापरत असणाऱ्या नोटांची फिटनेस चाचणी होणार आहे.

(हेही वाचा – Indian Currency: कागदाशिवाय तयार होतात भारतीय नोटा, या मटेरियलचा होतो वापर!)

अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आता आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. जर तुमच्या खिशातील नोटा फिटनेस चाचणीत फेल ठरल्या तर त्या वापरता येणार नाहीत म्हणजेच त्यांची किंमत बाजारात शून्य होणार आहे.

आरबीआयने असे दिले आदेश

रिझर्व्ह बँकेने बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची फिटनेस तपासण्यासाठी नवीन मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकिंग प्रणालीमध्ये अनेक वर्षांपासून खराब नोट चालत आलेल्या आहेत. आरबीआयच्या या सूचनेनुसार नोटांचा फिटनेस तपासला जाईल. तुमच्या खिशात ठेवलेली नोट योग्य की अयोग्य आहे? हे तपासण्यासाठी आरबीआयने ११ मानके निश्चित केली आहेत.

10 What is the Current Repo Rate 2021 e1657087110868

  • रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागणार
  • फिटनेस टेस्टमध्ये कोपरे दुमडलेल्या, गोंद किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील.
  • बँकांना प्रत्येक तीन महिन्यांनी नोटाच्या फिटनेस टेस्टबाबत रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागेल.
  • कोणकोणत्या नियमांना किती नोटा पूर्ण करू शकल्या नाहीत, हे अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे.

या नोटांची किंमत होणार शून्य

  • कोपरे दुमडलेल्या
  • अतिशय घाणेरड्या
  • अवस्थेत असलेल्या
  • भरपूर धूळ असलेल्या
  • नरम पडलेल्या नोटा
  • ८ चौरस मिलीमीटर पेक्षा मोठे छिद्र असलेली नोट
  • नोटमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाणार
  • नोटेवर खूप डाग
  • पेनाची शाई असेल तर नोटांवर काही लिहिले असल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या पेटिंग असल्यास
  • नोटेचा रंग उडाला असेल तर
  • फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप
  • नोटांचा रंग गेला असल्यास

चांगल्या नोटा कुठे मिळणार

आतापर्यंत नोट सॉटिंग मशीनमध्ये फक्त खऱ्या आणि बनावट नोटांची ओळख होत होती. सध्या सर्व नोटा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नोटाची वर्गवारी करणारी यंत्रे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. बँक ग्राहकांची नोट नाकारून त्याऐवजी ग्राहकाला दुसरी नोट देणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.