‘काली’ मातेचा अपमान करणारी पोस्ट ट्विटरने हटवली

133

चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई हिने केलेल्या वादग्रस्त ट्विटर पोस्टवरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. ‘काली’ या डॉक्युमेंट्री फिल्मचं पोस्टर लीना हिने ट्विटरवर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लीना हिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ट्विटरकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून, लीनाची पोस्ट ट्विटरकडून हटवण्यात आली आहे.

ट्विटरने हटवली पोस्ट

लीना हिने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये काली मातेच्या वेशातील एका अभिनेत्रीने सिगारेट आणि LGBTQचा ध्वज हातात घेतला आहे. हा हिंदू देवी-देवतांचा अपमान असून यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तसेच लीना मणिमेकलाई वर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दिल्ली,उत्तर प्रदेश आणि मुंबईत लीनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या वाढत्या वादामुळेच लीनाची पोस्ट आता ट्विटरकडून हटवण्यात आली आहे.

कोण आहे लीना मणिमेकलाई?

कॅनेडियन चित्रपट दिग्दर्शक लीना ही मूळची तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील आहे. द इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंब कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. लीनाचे वडील पदवीधर होते, त्यांचा प्रबंध तामिळ अभिनेते पी. भारतीराजावर होता. इथूनच लीनाची चित्रपटांची आवड वाढली. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या १८ व्या वर्षी लीनाचे लग्न झाले. पण या लग्नानंतर तिने घर सोडले दुस-या धर्मातील व्यक्तीशी लग्न केले आणि नंतर घटस्फोट घेतला. लैंगिक संबंधांबाबतही ती वादात सापडली होती. 2017 मध्ये, MeToo मोहिमेअंतर्गत एका फेसबुक पोस्टने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश केला आणि चित्रपट निर्मात्या सुसी गणेशन यांच्यावर गुन्हेगारी बदनामीचा आरोप केला. या प्रकरणी प्रदीर्घ लढा सुरू होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.