आषाढी वारीसाठी रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांची सुविधा

155

येत्या रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. सोलापूर विभागात आषाढी यात्रेनिमित्त राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक ये-जा करतात. त्यामुळे ०११४७ पंढरपूर-मिरज विशेष गाडी सुरू केली आहे. मिरज-पंढरपूर ही गाडी १० जुलै रोजी १.३५ वाजता सुटणार आहे.

(हेही वाचा – शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला!)

  • पुणे ते वीरांगणा लक्ष्मीबाई स्थानकादरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये ०१९२१/२२ विशेष पुणे येथून वीरांगणा लक्ष्मीबाई स्थानक गाडीचा समावेश आहे.
  • साईनगर शिर्डी-पुरी साप्ताहिक २०८५७ एक्स्प्रेस पुरी येथून १५ जुलैपासून दर शुक्रवारी १०.२३ वाजता पुरीहून साईनगर शिर्डीला निघणारी गाडी पून्हा पूर्ववत करण्यात आली आहे.
  • नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आणि निजामाबाद-पंढरपूर स्पेशल रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. गाडी क्रमांक १७६१४ हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आणि ०१४१३ नियाजामाबाद-पंढरपूर स्पेशल गाडी ६: २० वाजता सुटणार आहे.

एका दिवसासाठी पंढरपूर मिरज पॅसेंजर 

पंढरपूर मिरज या पॅसेंजरच्या माध्यमातून मिरज सांगली या ठिकाणी जाऊन पुन्हा सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र या गाडीला लॉकडाऊनपासून बंद ठेवण्यात आले असून, ही गाडी केवळ आषाढीच्या पार्श्वभूमीवर एक दिवस सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आषाढी झाल्यावर ही गाडी अशी सुरू ठेवली जाईल का किंवा ही गाडी नागरिकांच्या सुविधेचा विचार करून पुढे चालू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवला जाईल का? याबाबत मात्र प्रशासनाने मौन बाळगले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.