BCCI ने सात महिन्यांत शोधला सातवा कर्णधार

133

बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघाची बुधवारी घोषणा केली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली असून, अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा उपकर्णधार असेल. टीम इंडियाने शिखरच्या रुपात सात महिन्यांत सातवा आंतरराष्ट्रीय कर्णधार शोधला आहे. मालिकेतील तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवले जातील.

रोहित शर्मा व विराट कोहलीसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. लोकेश राहुलही संघात नाही. ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

नवी मालिका, नवा कर्णधार

2022 वर्ष भारतीय क्रिकेटसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. यंदा बीसीसीआयने जवळपास प्रत्येक मालिकेमध्ये नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळवला. आता आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताने संघाची धुरा शिखर धवनच्या खांद्यावर सोपवली आहे.

( हेही वाचा Happy Birthday MS Dhoni : धोनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे ‘५ रेकाॅर्ड्स’ )

यंदाचे भारतीय संघाचे कर्णधार

  • द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका- विराट कोहली
  • द.आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका- लोकेश राहुल
  • श्रीलंका व वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका- रोहित शर्मा
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका – ऋषभ पंत
  • आयर्लंडविरुद्ध टी- 20 मालिका- हार्दिक पांड्या
  • इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी- जसप्रीत बुमराह
  • इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका- रोहित शर्मा
  • वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका- शिखर धवन

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.