संजय राऊत हे शरद पवारांच्या जवळचे आहेत. शरद पवारांचीच स्तुती करतात, असे आरोप वारंवार केले जातात. हिंदुत्ववादी शिवसेनेचे नेते असूनही संजय राऊत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्तुती का करतात, यावर राऊतांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवरचे ते एकच नेते आहेत, त्यामुळे शरद पवारांची स्तुती करायची नाही, तर कुणाची करायची? असा सवाल राऊतांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, केवळ मीच नाही तर भाजपचे अनेक नेतेही शरद पवारांचे कौतुक करतात. महाविकास आघाडीतील प्रत्येक निर्णय घेण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी )
भाजपाचेच लोक जास्त कौतुक करतात
शरद पवार यांची स्तुती करण्यावर राऊत म्हणाले की, फक्त मीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्याविषयी बोलतात. या देशातला कोणता नेता त्यांच्याविषयी बोलत नाही. स्वत: नरेंद्र मोदी असतील, नितीन गडकरी. भाजपाचेच लोक जास्त कौतुक करतात. ते कौतुकास्पद व्यक्तीमत्व आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचेच कौतुक करायचे नाही, तर कुणाचे करायचे हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावे. कारणं काहीही असतील. तुम्ही त्याच सरकारमध्ये अडीच वर्षे होता. त्यामुळे असे आरोप करण्यात तथ्य नाही, असे उत्तर संजय राऊत यांनी नाराज आमदारांना दिले आहे.
Join Our WhatsApp Community