गेल्या 18 दिवसांत 8 विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटनांमुळे विमान वाहतूक नियामकाने बुधवारी स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (DGCA) स्पाईसजेट एअरलाइन्स विमान नियम, 1937 च्या 11 व्या अनुसूची आणि नियम 134 च्या अटींनुसार सुरक्षित, दक्ष आणि विश्वसनीय विमान सेवा देण्यात अपयशी ठरली आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तांत्रिक बिघाडाच्या घटनांची समीक्षा केल्यानंतर, स्पाईस जेटने आंतरिक सुरक्षा आणि देखभालासाठी योग्य पावले उचलली नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या, असे डीजीसीएने या नोटीसमध्ये म्हटले असून, उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.
छोट्याशा त्रुटीचीही सखोल चौकशी होणार
डीजीसीएच्या नोटिशीबाबत प्रतिक्रिया देताना, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. सिंधीया यांनी या संबंधी ट्वीट केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. शिंदे यांनी या संबंधी ट्वीट केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणा-या छोट्याशा त्रुटीचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
( हेही वाचा: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा! आता स्वस्तात बांधता येणार घर; गृहकर्जावरील व्याजदर झाले कमी )
‘इंडिगो’ च्या विमानात धूर
इंडिगोच्या रायपूर-इंदूर या दरम्यानचे विमान उतरल्यानंतर, वैमानिकांना केबिनमध्ये धूर दिसला. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना सुरक्षित उतरवले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली. ए 320 हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर धूर दिसला. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या संदर्भात इंडिगोने प्रतिक्रिया दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community