एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री बनले. पण याआधीच्या 19 मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवले आहे. राजकीय चातुर्यासाठी एकनाथ शिंदेंचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. पण याहूनही एक अनोखा रेकाॅर्ड एकनाथ शिंदेंच्या नावावर आहे. शिंदे आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे का ठरतात? ते जाणून घेऊया.
पहिले दाढीवाले मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला लाभलेले पहिले दाढीवाले मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात 19 मुख्यमंत्री होऊन गेले, पण एकालाही दाढी नव्हती. मिशी ठेवणारे अनेक मुख्यमंत्री होते. नारायण राणे, देवेंद्र फडणवीस ही त्यातली काही उदाहरणे. पण दाढी आणि मिशी असणारा मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्राला मिळालेला नव्हता. शिंदेंच्या रुपाने तो महाराष्ट्राला मिळाला आहे. कधीकाळी एकनाथ शिंदे यांना ठाण्यात दाढीवाले बाबा असं गंमतीने म्हटलं जायचं. आता या दाढीने शिंदे यांना महाराष्ट्राचा पहिला दाढीवाला मुख्यमंत्री बनवले आहे.
( हेही वाचा: फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद नव्हे; तर भारतातल्या ‘या’ शहरांचीही बदलण्यात आली नावे )
कपाळावरील लाल टिळा
अजून एक विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कपाळावर लावत असलेला लाल टिळा. शिंदे जितक्या ठळकपणे कपाळावर लाल टिळा लावतात, त्याप्रमाणे आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने लावलेला नाही. मनोहर जोशी कधी कधी गंध लावायचे किंवा अनेक मुख्यमंत्री काही विशिष्ट प्रसंगात, एखाद्या उत्सवाच्या वेळेला लाल टिळा लावायचे. पण एकनाथ शिंदे म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती त्यांची लांबलचक दाढी आणि कपाळावर असणारा लाल टिळा. एकनाथ शिंदेंना याच दोन गोष्टी इतर सर्व मुख्यमंत्र्यांपासून वेगळं ठरवतात.
Join Our WhatsApp Community