पावसाचे थैमान सलग तिस-या दिवशीही सुरू असून गुरुवारी, 7 जुलै रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात अतिवृष्टीचा इशारा देत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी, 8 जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यासह कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांना तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूराला रेड अलर्ट जाहीर केला आहे.
प्रत्येक तासाला या जिल्ह्यांत किमान ३० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकतो
गुरुवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारपर्यंत वेगवेगळ्या दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी रेड अलर्ट जारी केलेल्या पालघर, दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्हे, मध्य महाराष्ट्रात किमान ६५.४ ते २०४.४ मिमीपर्यंत पावसाची दाट शक्यता आहे. प्रत्येक तासाला या जिल्ह्यांत किमान ३० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकतो. त्यातुलनेत गुरुवारी मुंबई आणि ठाण्यात पाऊस फारसा नसेल. मुंबई, ठाण्यात सकाळी पावसाची संततधार दिसून आली. दोन्ही भागांत सकाळी दहानंतर पावसाचा जोर ब-याच ठिकाणी ओसरल्याचे चित्र आहे. सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.
(हेही वाचा मुंबईत अतिवृष्टीसह वाहणार जोरदार वारे; नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्येही पावसाच्या संततधारेचा इशारा)
Join Our WhatsApp Community