आता घरबसल्या घेता येणार विठ्ठल-रुक्मिणीचे LIVE दर्शन!

142

येत्या रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता भाविकांना घरबसल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन जिओ टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांसाठी जिओ तर्फे ही एक अनोखी भेट असणार आहे.

(हेही वाचा – आषाढी वारीसाठी रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांची सुविधा)

आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे भाविकांचा महासागर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतो. लाखो भाविक तासन-तास रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन घेतात. परंतु सर्वाना कोरोना महामारीमुळे आणि अन्य कारणाने पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. वयोवृद्ध तसेच आजारी भाविकांना इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही परंतु आता जिओ टीव्हीच्या माध्यमातून ही अडचण दूर होणार आहे.

त्यामुळे आता घरबसल्या कधीही 24 तास पांडुरंगाचे LIVE दर्शन घेता येणार असून महापूजा, अभिषेक तसेच इतर विधी घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहेत. जिओ टीव्ही अँप डाउनलोड करून तसेच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.