भाजपा नेता बनला निराधार माता आणि निरागस बालकांचा आधार

123

मुंबईतील जुहू या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यावेळी एका मुलाला वाचवताना एका आईने तिचा मुलगा गमावला आणि दोन मुलांनी आपले वडील गमावले. या असहाय कुटुंबाच्या मदतीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी 25000 रुपयांची आर्थिक मदत देऊन मदतीचा हात पुढे केला.

आशिषने अनोळखी मुलाचा जीव वाचवला पण स्वतःच्या मुलांना अनाथ केले

3 जुलै रोजी संध्याकाळी सांताक्रूझचा रहिवासी आशिष आणि त्याची मुले त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी जुहू बीचवर पोहोचले होते. त्यावेळी एक लहान मूल पाण्यात बुडत असल्याचे आशिषने पाहिले आणि मुलाला वाचवण्यासाठी आशिषने पाण्यात उडी मारली. आशिषने मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले. मुलाला वाचवताना आशिषचा पाय पाण्याखाली काही खडकांमध्ये अडकला आणि आशिष बाहेर येऊ शकला नाही. आशिषने एका अनोळखी मुलाचा जीव वाचवला पण स्वतःच्या मुलांना अनाथ केले. या कुटुंबाप्रती असलेली आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी आशिषच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. तसेच आशिषच्या मुलांसाठी पुस्तके, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य दिले. तिवाना यांनी आशिषच्या वृद्ध आईशी संवाद साधताना भाजप युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता मध्यरात्रीही आशिषच्या मुलांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी उभा आहे आणि आशिषच्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

(हेही वाचा मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे सरकारला धक्का, तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.