चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

133

चित्रपट निर्माता संदीप सिंह याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, ही धमकी सिंह याच्या फेसबुक अकाउंटला कृष्णा राजपूत नावाच्या अनोळखी अकाउंटवरून देण्यात आली आहे. ‘मुसावाला को जिस तरसे गोली मारी थी उसी तरह एक दिन तुझे मारा जायेगा, या आशयाची धमकी सिंह यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात सिंह यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

संदीप सिंह हे हिंदी चित्रपट निर्माते असून त्यांनी अटल बिहारी वाजपेयी जीवनावर आधारित ‘अटल’ तसेच वीर सावरकर यांच्यावर आधारित ‘स्वातंत्रवीर सावरकर ‘ त्याचबरोबर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने कृष्णा राजपूत या फेसबुक अकाउंटवरून सिंह यांच्या अधिकृत फेसबुकवर एका पोस्टखाली कमेंटबॉक्समध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, “चिंता ना कर जिस तरह सिद्धू मुसेवाला को गोली मारा गया है , ठीक उसी तरह तुझे भी एक दिन मारा जायेंगा वेट कर और याद रख” या आशयाची धमकी देण्यात आली आहे.

( हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे होणार अनावरण)

याप्रकरणी संदीप सिंह यांनी आंबोली पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी फेसबुक खातेदाराविरुद्ध धमकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा काही संबंध आहे का याबाबत तपास सुरु असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.