कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेने ७४ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या गाड्यांचे आरक्षणही सुरू करण्यात आले. मात्र अवघ्या काही वेळात या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार आहेत. रेल्वेतर्फे जादा ७४ फेऱ्यांची घोषणा झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र या गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
गाड्यांचे बुकिंग झाले फुल्ल
यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपासून चाकरमान्यांनी कोकणात दाखल होणार आहेत. मात्र २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीतील सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या, मंगलोर, तुतारी एक्स्प्रेस या नियमित गाड्यांमध्ये वेटिंगची क्षमता संपल्याने सीटिंग आणि स्लीपरचे आरक्षणही बंद झाले आहे. यामुळेच कोकण रेल्वेने आणखी ३२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून याचे आरक्षण सुरू झालेले आहे.
( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा! आता स्वस्तात बांधता येणार घर; गृहकर्जावरील व्याजदर झाले कमी )
दोन वर्षांत निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना गावी जाता आले नव्हते. कोकणात होळी आणि गणेशोत्सव हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. चाकरमान्यांना गणपतीचे वेध लागले आहेत. त्यात कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
Join Our WhatsApp Community