व्हॉट्सअॅप (Whatsapp) या मेसेंजिंग अॅपचा वापर जगभरातील लाखो युजर्स करतात. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला नवनवीन सुविधा देत असते. व्हॉट्सअॅपवर जर कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर तुम्ही अशा व्यक्तीला सहज ब्लॉक करू शकतात. ब्लॉक केलेला युजर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पुन्हा कधीच मेसेज किंवा कॉल करू शकत नाही. अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करते तरीही आपल्याला कळत नाही परंतु तुम्ही या सोप्या ट्रिकने अगदी सहज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणी ब्लॉक केले आहे हे तपासू शकता.
( हेही वाचा : कोकणात जाताय? परशुराम घाट बंद; पर्यायी मार्गावर फक्त ‘या’ वाहनांनाच प्रवेश मिळणार!)
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे हे कसे ओळखाल?
- जर तुम्हाला एखाद्या युजरने ब्लॉक केले असेल तर तुम्हाला संबंधित व्यक्तीचा DP म्हणजेच प्रोफाइल फोटो दिसणार नाही. अनेकजण Profile Photo ठेवत नाही त्यामुळे अशावेळी तुम्ही संबंधित युजरला मेसेज सेंड करू शकता. जर युजरला मेसेज सेंड झाला आणि सिंगल टिक दिसत असेल तर तुम्हाला संबंधित युजरने ब्लॉक केलेले असते.
- तुम्हाला एखाद्या युजरचा Last seen किंवा स्टेटस, प्रोफाईलमधील about दिसत नसेल आणि सेंड केलेल्या मेसेजवर डबल टिक दिसत नसल्यास त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केलेले असते.
- व्हॉट्सअॅपवर तुम्ही कॉलिंग (Call) सुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या युजरने ब्लॉक केले त्याला तुम्ही कॉल केल्यावर, तुमचा कॉल रिंग होणार नाही. केवळ कॉलिंग लिहिलेले दिसेल अशा वेळी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले असते.