राज्याच्या उपराजधानीत नागपूरमध्ये बीए व्हेरिएंटचे २० रुग्ण आढळल्याची माहिती गुरुवारी आरोग्य विभागाने दिली. नागपूरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली. हे सर्व रुग्ण बीए २.७५ व्हेरिएंटचे आहेत. नव्या २० रुग्णांमुळे राज्यातील बीए व्हेरिएंटच्या रुग्णाची संख्या ३० वर पोहोचली आहे.
( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे असलेला ‘हा’ अनोखा रेकाॅर्ड माहितीय का ?)
नागपूरात बीए व्हेरिएंटचे २० रुग्ण
हे सर्व नमुने १५ जून ते ५ जुलै दरम्यान आढळले. २० रुग्णांपैकी एक रुग्ण १८ वर्षांखाली आहे. ९ रुग्णांचे वय १९ ते २५ वर्षांदरम्यान आहे. २६ ते ५० वर्षांदरम्यान ६ रुग्ण, तर ४ रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहेत. १७ रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. काही रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे तर काही रुग्ण लक्षणेविरहित आहेत. सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांतून २ हजार ६७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार २३८ रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले. राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र गुरुवारी ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्क्यांवर कायम आहे.
Join Our WhatsApp Community