महापालिका नाही, तर शासन बांधणार धारावीत रोहिदास भवन, लेबल कॅम्पमध्ये आंबेडकर सभागृहाची उभारणी

171

मुंबई महापालिकेतील तत्कालीन सत्ताधार पक्षाने धारावीमध्ये रोहिदास भवन बांधण्याची घोषणा केली. परंतु महापालिकेच्यावतीने रोहिदास भवन बांधू न शकणाऱ्या शिवसेनेने राज्यात ठाकरे सरकार येताच धारावीतील अशोक मिल कंपाऊंडमध्ये हे भवन बांधण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय ठाकरे सरकार बरखास्त होण्यापूर्वी २९ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

( हेही वाचा : चाकरमान्यांसाठी अतिरिक्त ३२ गणपती उत्सव विशेष गाड्या )

१० टक्के निधी मंजूर 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत धारावीतील अशोक मील कंपाउंड संत रोहिदास भवन बांधणे या कामासाठी ५ कोटीच्या मर्यादेत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकी याबबत निर्णय घेण्यात आला होता. हे बांधकाम म्हाडाच्या माध्यमातून बांधले जाणार आहे आणि या भवनच्या निर्मितीसाठी एकूण तरतुदींपैकी १० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना खासदार राहुल शेवाळे यांनी यासाठी एक लाख रुपयांची ठोक तरतूद केली होती. परंतु त्यानंतर प्रत्येक वर्षी पुढील स्थायी समिती अध्यक्षांकडून ठोक तरतूद केली जात होती. पण महापालिकेला हे भवन बांधता आले नसून राज्यात २०१९मध्ये ठाकरे सरकार आल्यानंर त्यांनी सरकार बरखास्तीच्या शेवटच्या दिवसांमध्ये २९ जून रोजी हे भवन बांधण्यासाठी शासन निर्णय घेतला गेला.

रोहिदास समाजाचा सन्मान केला

धारावीतील शिवसेना माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. रोहिदास भवन धारावीत बनले जावे यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आपण स्वत: आग्रही होते, मागील वर्षी सरकारकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शासन निर्णय घेत एकप्रकारे रोहिदास समाजाचा सन्मानच केला आहे अशाप्रकारची प्रतिक्रिया नकाशे यांनी व्यक्त केली आहे.

धारावीत रोहिदास भवनाबरोबरच धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्याचाही शासन निर्णय घेण्यात आला आहे. या सभागृह बांधण्याच्या कामासाठी ५.०० कोटींच्या मर्यादित तत्वत: मान्यता देण्यात आली होती, परंतु आता यातील १० टक्के निधी वापरण्यास शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.