राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाच्याविरोधात सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाने शिवसेनेने विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. यासह इतर याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयात 11 जूलै रोजी सुनावणी होणार आहे.
( हेही वाचा: बाळासाहेबांपासून राऊतांपर्यंत वादग्रस्त विधानांची राजकीय मालिका! फक्त एका क्लिकवर…)
Join Our WhatsApp Community