कल्याण -डोबिंवलीतून उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; 55 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सहभागी

128

शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, आता उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे अनेक बैठका घेत आहेत. तसेच नवे उपक्रम घेऊन पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असे असताना शिवसेनेला लागलेली गळती कायम आहे. आता कल्याण- डोंबिवलीचे 55 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली येथील नगरसेवकरांनी आपला पाठिंबा शिंदे गटाला असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शहरप्रमुख राजेश मोरेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याचे वृ्त्त आहे. राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, असे असताना शिवसेनेला राम राम करणा-या आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांच्या संख्येत वाढ होत आहे.

( हेही वाचा: पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.