मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले होते. नॅशनल स्टाॅक एक्स्चेंजमधील सर्व्हर ( राष्ट्रीय शेअर बाजार) घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. यानंतर आता 2009 ते 2017 या काळात NSE कर्मचा-यांचे फोन बेकायदेशीर टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे.
एमएचएच्या आदेशानंतर सीबीआयने एनएसई घोटाळ्यात बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पांडे आरोपी ठरवण्यात आले आहेत. याप्रकरणी देशभरात सीबीआयने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. NSE घोटाळ्यातील आरोपी चित्रा हिने संजय पांडे यांना NSE मधील लोकांचे फोन टॅप करण्यास सांगितले होते.
( हेही वाचा: उत्तराखंडमध्ये अर्टिगा कार नदीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; तर बचावलेली महिला शाॅकमध्ये )
Join Our WhatsApp Community