23 कोटी भारतीयांचे बँक खाते नाही; जागतिक बँकेचा अहवाल

129

जगभरातील तब्बल 140 कोटी व्यक्तींची आजही बॅंकेची खाती नाहीत. बॅंकिंग सेवेपासून वंचित असलेले सुमारे 74 कोटी म्हणजेच 54 टक्के लोक हे सात विकसनशील देशांमध्ये राहत असून, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार, भारतात बॅंक खातेदारांची संख्या अधिक असूनही देशातील 23 कोटी लोक बॅंकिंग सेवेपासून वंचित आहेत. चीनमध्ये 13 कोटी लोकांकडे बॅंकिंग सेवा नाही.

किती महिला वंचित

  • जागतिक फाइडेक्स डेटाबेस 2021 नुसार, जगातील 76 टक्के व्यक्ताीकडे बॅंक खाते आहे, तर 13 टक्के महिला व 11 टक्के पुरुषांकडे ही सुविधा नाही.
  • खातेदारांची संख्या वाढलेल्या देशांमध्येही खाते नसलेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.
  • मोबाईलची कमतरता, ओळख कागदपत्रांचा अभाव आणि आर्थिक क्षमतेचा अभाव यामुळे महिला बॅंकिंगपासून दूर राहत आहेत.

( हेही वाचा: ‘धनुष्यबाण’ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही: उद्धव ठाकरे )

बॅंकांवरील विश्वास कमी झाला

  • भारतात, 2021 मध्ये सुमारे एक तृतीयांश ग्राहकांची बॅंक खाती निष्क्रिय होती, हे प्रमाण जगातील सर्वोच्च आहे. याचे कारण बॅंकांवरील कमी झालेला विश्वास
  • कुटुंबातील एका सदस्याचे खाते आधीच असल्याने अनेक लोक खातेही उघडत नाहीत. भारतात महिला आणि पुरुषांची बॅंक खात्यांची संख्या जवळपास समान आहे.
  • सरकारी योजनांचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जात असल्याने, त्यांची संख्या वाढली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.