शिंजो आबेंच्या मृत्यूनंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

171

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, माझ्या सर्व प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत- जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. तसेच, देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे.

काय म्हणाले जपानचे पंतप्रधान

जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे रानटी आणि द्वेषपूर्ण असून ते सहन केले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. आम्ही जे काही करु शकतो ते करु असेही ते म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.