राज्यातील ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

146

राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका शुक्रवारी, ८ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणुकांच्या घोषणेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर केला आहे. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची प्रक्रीया २० जुलै रोजी होणार आहे. तेव्हापासून आचारसंहिता लागू होणार आहे.

92 नगरपालिका आणि 4 नरपंचायतींची यादी

अ वर्गातील नगरपरिषदा 

भुसावळ (जि. जळगाव), बारामती (जि. पुणे), बार्शी (जि. सोलापूर ), जालना (जि. जालना), बीड (जि. बीड), उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

ब वर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा

मनमाड, सिन्नर, येवला

धुळे जिल्हा 

दोंडाईचा-वरवाडे, शिरपूर-वरवाडे

नंदुरबार जिल्हा

शहादा

जळगाव जिल्हा

अमळनेर, चाळीसगाव

अहमदनगर जिल्हा

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर

पुणे जिल्हा

चाकण, दौंड

सातारा जिल्हा

कराड, फलटण

सांगली जिल्हा

इस्लामपूर, विटा

सोलापूर  जिल्हा

अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर जिल्हा

जयसिंगपूर

औरंगाबाद जिल्हा

कन्नड, पैठण

बीड जिल्हा

अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ

लातूर जिल्हा

अहमदपूर

अमरावती जिल्हा

अंजनगाव-सुर्जी

क वर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हा

चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर

जळगाव जिल्हा

वरणगाव, धरणगाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल

अहमदनगर जिल्हा

जामखेड, शेवगाव, देवळाली, प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी

पुणे जिल्हा

राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर

सातारा जिल्हा

म्हसवड, रहिमतपूर, वाई

सांगली जिल्हा

आष्टा, तासगाव, पलूस

सोलापूर जिल्हा

मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मेंदगी, मंगळवेढा, सांगोला

कोल्हापूर जिल्हा

गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव

औरंगाबाद जिल्हा

गंगापूर, खुल्ताबाद

जालना जिल्हा

अंबड, भोकरदन, परतूर

बीड जिल्हा

गेवराई, किल्ले, धारुर

उस्मानाबाद जिल्हा

भूम, कळंब, मुरुमनळ, दुर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर

लातूर जिल्हा

औसानिलंगा

अमरावती जिल्हा

दर्यापूर

बुलडाणा जिल्हा

देऊळगाव

 नगरपंचायतांच्याही निवडणुका

अहमदनगर – नेवासा, पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित), पुणे/बारामती – माळेगाव, बुद्रुक (नवनिर्वाचित), सोलापूर/मोहोळ – अनगर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.