संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचे थैमान सुरु असताना मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महिन्याभरातील अर्ध्याहून जास्त पावसाची कमतरता भरुन निघाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात सात दिवसांत ५८३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. संपूर्ण जुलै महिन्यात सांताक्रूझ केंद्रात ८५५.७ मिलीमीटर पावसाची अपेक्षा आहे. आठवड्याभरातच जुलै महिन्यातील अर्ध्याहून जास्त पाऊस झाला आहे.
यंदाच्या वर्षापासून देशभरातील वेधशाळेच्या देशभरातील स्थानकांमध्ये (शहरांमध्ये) प्रत्येक महिन्याला अपेक्षित पावसाच्या प्रमाणाची सुधारित यादी तयार होत आहे. वेधशाळेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख शहरांमधील सुधारित माहिती तयार झाली आहे. मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा अशी दोन वेधशाळेची स्थानके आहेत. सुरुवातीला मुंबईत जून महिन्यातील अपेक्षित पावसाची माहिती अद्यायावत केली गेली. आता जुलै महिन्यात सांताक्रूझ केंद्रात ५८३.८ तर कुलाबा येथे ३६४.१ मिलीमीटर पावसाची अपेक्षा आहे. मुंबईसाठी सांताक्रूझ केंद्रातील तापमान आणि पाऊस ग्राह्य धरला जातो. कुलाब्यातही आठवड्याभरात ३६४.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
(हेही वाचा HMIS ऑनलाइन रुग्णनोंदणी प्रक्रिया बंद झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी)
पुढील सात दिवसांसाठी मुंबईतील हवामानाचा अंदाज
- ९ जुलै – २८ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – मुसळधार पावसासह आकाश अंशतःआकाश ढगाळ राहील
- १० जुलै – २८ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – मध्यम स्वरुपाच्या पावसासह अंशतः आकाश ढगाळ राहील
- ११ जुलै – २७ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – मध्यम स्वरुपाच्या पावसासह अंशतः आकाश ढगाळ राहील
- १२ जुलै – २८ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – मुसळधार पावसासह आकाश अंशतः आकाश ढगाळ राहील
- १३ जुलै – २७ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – पावसाची शक्यता
- १४ जुलै – २७ कमाल तापमान (अंश सेल्सिअस) – २४ किमान तापमान (अंश सेल्सिअस) – पावसाची शक्यता