पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा ते जेजुरी दरम्यान पिसुर्टी येथे असणारे रेल्वे गेट दिनांक ८ ते १० जुलैपर्यंत या काळात वाहतुकीसाठी ४८ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या रेल्वे मेगाब्लॉक अपडेट )
रेल्वेचे आवाहन
रविवारी दिनांक १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा असल्याने त्याआधी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवल्याने यात्रेकरुंनी व स्थानिकांनी या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे – पंढरपूर महामार्गावर पिसुर्टी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी शुक्रवार ८ जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून ते रविवार १० जुलैपर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहिल अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव – जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community