टेस्ला कंपनीचे मालक एलाॅन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर $ 44 अब्जमध्ये विकत घेण्यासाठी केलेला करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. एलाॅन मस्क यांनी बनावट खात्यांची नेमकी संख्या लपवल्याचा आणि त्याबाबत मागितलेली संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप करत ही घोषणा केली आहे. मस्कच्या या निर्णयाला कायदेशीर मार्गाने न्यायालयात आव्हान देण्याचे ट्विटरने म्हटले आहे.
मस्क यांनी शुक्रवारी आरोप केला की ट्विटर कंपनी त्यांना बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पुरेशी माहिती देण्यात अयशस्वी ठरली आहे. म्हणून हा करार रद्द करत आहे. मस्कच्या या विधानावर ट्विटरने प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की कंपनी टेस्लाच्या सीईओबरोबरच्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर कारवाई करेल.
( हेही वाचा: vacancy : तरुणांनो, रेल्वेत नोकरी पाहिजे, तर ही बातमी वाचाच )
अखेर शंका खरी ठरली
एलाॅन मस्क आणि ट्विटर यांच्यातील हा प्रसिद्ध करार गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत असल्याचे दिसत होते. करार झाल्यानंतर काही दिवसांनी एलाॅन मस्कने बनावट खात्यांचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली. ट्विटरने दिलेली माहिती अपुरी असल्याचा आरोपही ते वारंवार करत होते. त्यांच्या या भूमिकेमुळे हा करार धोक्यात येण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. अखेर ही शंका खरी ठरली.
Join Our WhatsApp Community