34 हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI ची छापेमारी; 40 कोटींची पेंटिंग्स आणि मूर्ती जप्त

145

देशातील सर्वात मोठा बॅंक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल 34 हजार 615 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा आता सीबीआयला संशय आहे. सीबीआयने शुक्रवारी मुंबईत अजय नावंदर या व्यक्तीच्या घरावर छापेमारी केली. अजय नावंदल हा छोटा शकीलचा अत्यंत जवळचा साथीदार असल्याचे समजते. या घोटाळ्यातील काही पैसा हा नावंदरच्या माध्यमातूनही फिरवण्यात आल्याचा सीबीआयला संशय असून, त्यादृष्टीने आता तपास सुरु झाला आहे. या छापेमारीत 40 कोटींची पेंटिंग्स आणि मूर्तीही जप्त करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आज त्यांच्याकडे ना चिन्ह ना पक्ष; मनसेने सुनावलं )

काय आहे प्रकरण?

उपलब्ध माहितीनुसार, हे कर्ज प्रकरण सन 2010 मधील आहेत. 24 जुलै 2010 रोजी एकूण 29 बॅंकांच्या समूहाने या कर्जाचे वितरण केले होते, मात्र त्यातून 12 बॅंका बाहेर पडल्या. या प्रकरणात दिले गेलेले कर्ज फेडले जात नसून कर्जापोटी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याची गोष्ट ‘सन’मध्ये उजेडात आल्यानंतर या बॅंकांनी केपीएमजी कंपनीला लेखापरीक्षणासाठी नेमले. या परीक्षणात या कर्ज रकमेचा अपहार झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकरणी डीएचएफलचे वाधवान, व्यावसायिक सुधाकर शेट्टी, स्कायलार्क बिल्डकाॅन प्रा. लि., दर्शन डेव्हलपर्स प्रा. लि., सर्गीता कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स प्रा.लि., सबलिक रिअल इस्टेट आदी लोकांचे तसेच कंपन्यांचे तसेच काही सरकारी अधिका-यांचेही नाव या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये नमूद आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.