राज्यात नगरपालिका निवडणूका जाहीर झाल्या आहेत. नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सदर गोष्टीची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षण देऊनच निवडणूका होतील, अशी खंबीर पावले उचलावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. राज्यात 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदांच्या आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होतील. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्त्वात राज्यात नवे सरकार आले आहे. तरीही ओबीसी आरक्षणाविना निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मागणीवर भाजपची काय भूमिका आहे, हे पाहावं लागणार आहे.
( हेही वाचा: शिवसेनेने आता ‘या’ दोन नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी )
आदर्श लोकप्रतिनिधी, कुशल संघटक, निस्पृह स्वयंसेवक, भारतीय जनता पक्षाच्या जडण-घडणीत बहुमूल्य योगदान असलेले थोर तत्त्वज्ञ श्रद्धेय रामभाऊ म्हाळगी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.@RSSorg pic.twitter.com/09Var3p5mG
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 9, 2022
पंकजा मुंडेंची मागणी
शुक्रवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर ओबीसींच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शनिवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे यासंबंधीचे ट्वीट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या, काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावले उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे.
Join Our WhatsApp Community