राज्यात सध्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही शुक्रवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भिताचे वातावरण पसरले आहे. तसेच परभणीतही मोठा पाऊस झाला आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने महाबळेश्वरील पाचगणी रस्त्यावरील वाहतूक थांबवली आहे. पर्यटक रस्त्यावरील वाहतूक थांबवली आहे. पर्यटक रस्त्यात अडकले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने वेण्णा नदीतल्या सांडव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहे.
( हेही वाचा: विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा! या मार्गावर सुरू होणार वातानुकूलित बस )
अनेक गावांचा संपर्क तुटला
दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतक-याची पीके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. नांदेड शहरातील गावांत पाणी शिरले आहे. तालुक्यातील शेलगाव, खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Join Our WhatsApp Community