गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा आणि नाणी विका आणि करोडपती व्हा, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. ऑनलाईन माध्यमातून ही नोटा, नाणी विकून लोकांना पैसे कमावण्याचे आमिष लोकांना दाखवण्यात येत आहे. त्यासाठी RBI च्या नावाचा वापर केला जात असल्याने यावर अनेक लोक विश्वास देखील ठेवत आहेत. पण आता याचबाबत भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नागरिकांना सावध करण्यात येत आहे.
आरबीआयने केले स्पष्ट
अशाप्रकारच्या कुठल्याही व्यवहारांशी आरबीआयचा कुठलाही संबंध नसून, त्यासाठी आरबीआयकडून इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, तसेच कुठल्याही प्रकारचे कमिशन देखील घेतले जात नाही. तसेच अशा व्यवहारांसाठी आरबीआयकडून कोणतीही संस्था अथवा व्यक्तीला कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)
फसवणुकीला बळी पडू नका
अशाप्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन नोटा किंवा नाणी विकण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. त्यामुळे अशाप्रकारे कुठल्याही बनावट आणि फसव्या ऑफर्सवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन देखील आरबीआयकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community