Google Maps मुळे तुमचा प्रवास होईल सोपा! टोल, ATM, पेट्रोल पंपांची माहिती मिळणार एका क्लिकवर

128

एखाद्या नव्या ठिकाणी जायचे असेल तर आपण रस्ते, तेथील परिसरातील माहिती घेण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतो. काही वर्षांपूर्वी आपण कोणत्याही नव्या जागेत गेलो तर आपल्याला थांबून हे ठिकाण कुठे आहे असे विचारावे लागायचे परंतु आता गुगल मॅपमुळे (Google Map) आपण कधीही कुठेही फिरू शकतो. या गुगल मॅपमध्ये अनेक नवनवे फिचर्स ( Google Map features) आहेत याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : Aadhaar – Pan linking : आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी १००० रुपये पेनल्टी! कसा व कुठे भराल दंड )

गुगल मॅपमध्ये टोलची माहिती

गुगल मॅपच्या नव्या फिचरनुसार आपल्याला कोणत्या मार्गावर किती टोल द्यावा लागेल याची माहिती मिळते. टोल किती भरावा लागेल याची पूर्व माहिती मिळाल्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार मार्ग निवडू शकतो. जास्त टोल असलेल्या रस्त्याने न जाता तुम्ही दुसऱ्या रस्त्याची माहिती Google Maps च्या मदतीने घेऊ शकता. गुगल मॅप अशाही रस्त्यांची माहिती देईल जिथे टोलनाके कमी असतील तुम्ही गुगल मॅप्सवर लोकेशन सेट केल्यानंतर टोल फ्री रस्ते दिसतील यामुळे तुमचे पैसे वाचतील.

गुगल मॅपवर मिळते पेट्रोल पंप- ATM ची माहिती

तुम्ही अनेकदा लांबचा प्रवास करत असताना तुम्हाला स्थानिक ठिकाणांविषयी माहिती नसते. दुर्गम भागात प्रवास करताना आपल्याला पेट्रोल – डिझेल पूर्ण भरावे लागते. अशावेळी तुम्हाला गुगल मॅपद्वारे रस्त्यात येणारे पेट्रोल पंप, हॉटेल्स, कॅफे, फास्ट फूड कॉर्नर आणि ATM याची संपूर्ण माहिती मिळेल.

ट्रॅफिक जॅमची माहिती मिळणार

Google Maps वर तुम्हाला ट्रॅफिकची माहिती मिळेल. तुम्ही घरातून निघताना कशाने प्रवास करणार उदा. बाईकने प्रवास करत असल्यास तुम्ही गुगल मॅपवर Bike Route निवडू शकता. ट्रॅफिकमध्ये अनेकवेळा खोळंबा होतो म्हणून तुम्ही घरातून निघण्यापूर्वी रस्त्यावरील ट्रॅफिकचा अंदाज घेऊन बाहेर पडू शकता.

एकावेळी अनेक रुटचा समावेश

गुगल मॅप नेहमी आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणते. कंपनीने मॅप्स सर्विसमध्ये Add features चा समावेश केला आहे. याच्या मदतीने युजर एकाचवेळी ९ लोकेशनचा रुटमध्ये समावेश करू शकतात. म्हणजेच मॅपवर अनेक लोकेशन रुट सेव्ह करता येऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.