आनंदाची बातमी! लवकरच महागाई होणार कमी, RBI चा दावा

149

गेल्या काही दिवसांपासून महामागाईच्या दरात मोठी वाढ होत आहे. संपू्र्ण देशात महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे महगाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आता याबाबतच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठे विधान केले आहे. लवकरच महागाईचा हा दर कमी होणार असल्याचा विश्वास दास यांनी व्यक्त केला आहे.

आरबीआयचे प्रयत्न

ऑक्टोबर ते मार्चदरम्यानच्या दुस-या सहामाहीमध्ये महागाई दरात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्व उपाय करण्यात येत आहेत. त्यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या चांगले संकेत दिसत असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. कौटिल्य आर्थिक संमेलनात बोलताना दास यांनी ही माहिती दिली आहे.

(हेही वाचाः जुन्या नोटा आणि नाण्यांबाबत व्हायरल होत असलेल्या मेसेजवर आता RBI चे स्पष्टीकरण)

अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न

सध्या पुरवठा दर हा खूप चांगला आहे, त्यामुळे सध्याची महागाई हळूहळू कमी होताना दिसेल. संपूर्ण जग सध्या महागाईमुळे त्रस्त आहे, त्यातच जागतिक व्यापारात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय आपले धोरण कायम बदलत राहील, असे दास यांनी म्हटले आहे.

रेपो दरात वाढ

लोकांच्या हातात पैसा खेळत राहिल्यामुळे लोक वस्तूंची जास्त मागणी करतात आणि मागणी व पुरवठ्याचा समतोल बिघडल्यामुळे महागाई वाढत असते. त्यामुळेच आरबीआयने नुकतीच बँकांच्या रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी देखील आपली कर्जे महाग केली असून ठेवींवर मिळणा-या व्याजदरात घट झाली आहे.

(हेही वाचाः 500 च्या ‘या’ नोटा आहेत खोट्या? केंद्र सरकारचा मोठा खुलासा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.