पॅनकार्ड म्हणजे Permanent Account Number. भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र पॅनकार्ड बनवण्याचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या देखरेखीखाली आयकर विभाग करत असते. एक दिवसाचा बालक असो किंवा 60 वर्षांचा वयस्कर मनुष्य, पॅनकार्ड हे सगळ्यांसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. पॅनकार्डवरील 10 आकडी क्रमांक प्रत्येक व्यक्तीची युनिक ओळख मानली जाते. या युनिक क्रमांकावरून व्यक्तीचा आर्थिक व्यवहाराचा तपशील तपासला जातो.
आर्थिक व्यवहारात पॅन कार्डचा वापर महत्त्वपूर्व मानला जातो. याशिवाय हे ओळखपत्र म्हणूनही काम करते. बँकांमधील व्यवहारांसाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे. तुमचा परमनंट अकाउंट नंबर हा पॅन कार्डमध्ये टाकला जातो. हा क्रमांक तुमच्या आर्थिक व्यवहारांशीही संबंधित असतो. यामध्ये आयकर विभागासाठी आवश्यक असलेली बरीच माहिती आहे.
(हेही वाचा -RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)
या 10 आकडी क्रमांकात काही इंग्रजी अक्षरे आणि काही अंक लिहिलेले असतात. त्या 10 आकडी क्रमांकाचा अर्थ काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, तुमची संपूर्ण आर्थिक माहिती या आकड्यांमध्ये नोंदवली जाते. तुमच्या पॅन नंबरमध्ये काय रहस्ये दडलेली आहेत ते बघा….
पॅन कार्डच्या 10 आकडी क्रमांकाचा अर्थ काय?
पॅन कार्डवरील क्रमांकाचे पहिले तीन अंक हे इंग्रजी अक्षरे असतात. जे AAA ते ZZZ पर्यंत असू शकतात. तुमच्या पॅनमध्ये हे तीन अक्षरं कोणते असतील, हे आयकर विभागाने ठरवले आहे. पॅनचे चौथे अक्षर देखील इंग्रजीत आहे आणि ते आयकरदात्याची स्थिती दर्शवते. येथे P, C, H, A, T यापैकी कोणतीही अक्षरे असू शकतात.
चौथे अक्षर महत्त्वपूर्ण
चौथे अक्षर कार्डधारक कोण आहे हे दर्शवत असते. त्याचे वर्गीकरण खालील प्रमाणे केले जाते.
- -P हे अक्षर एका व्यक्तीसाठी असते
- -C हे अक्षर कंपनीसाठी वापरले जाते
- -H हिंदू अविभक्त कुटुंबासाठी हे अक्षर वापरले जाते
- -A लोकांच्या गटासाठी हे अक्षर वापरले जाते
- -B हे अक्षर body of persons (BOI)
- -G सरकारी एजन्सीसाठी हे अक्षर वापरले जाते
- -J आर्टिफिशल ज्यूडिशियल व्यक्तीसाठी हे अक्षर वापरले जाते
- -L हे अक्षर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी
- -F फर्म/ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) साठी हे अक्षर वापरले जाते
- -T ट्रस्ट, संस्थेसाठी हे अक्षर वापरले जाते
पॅन कार्डचे पाचवे अक्षरही इंग्रजी असते. कार्डधारकाच्या आडनावानुसार ठरवले जाते. यानंतर पॅन कार्डमध्ये 4 अंक लिहिलेले असतात. ही संख्या 0001 ते 9999 दरम्यान कोणतीही असू शकते. पॅनकार्डवर नोंदवलेले हे क्रमांक आयकर विभागात सध्या सुरू असलेली मालिका दर्शवितात. 10 अंकांच्या शेवटी एक अल्फाबेट अंक दिलेला असतो, ते कोणतेही अक्षर असू शकतो.
Join Our WhatsApp Community