महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्याला विठुरायाच्या पुजेचा मान मिळाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना वारकऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
विठुरायाच्या शासकीय महापुजेनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे. यासह मी माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यांसाठी विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. हे सरकार सर्वसामान्याचं सरकार असून वारकऱ्यांसाठी लागेल ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न, एकनाथ शिंदेंच्या ४ पिढ्यांनी घेतलं एकत्र विठुरायाचं दर्शन)
पुढे ते म्हणाले, माझ्यासाठी महापुजेचा दिवस हा आनंदाचा दिवस असून १२ कोटी जनतेच्या वतीने मी विठ्ठलाची पूजा केली आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातलंय. यावेळी राज्यातील कोरोनाचे संकंट लवकर दूर होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. लाखो वारकरी दरवर्षी पायी पंढरीची वारी करत असतात. दोन वर्षे कोरोनामुळे वारकरी या वारीत सहभागी होऊ शकले नव्हते परंतु यंदा दहा लाखाहून अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुढे शिंदे असेही म्हणाले की, उशीरा का होईना राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे परंतु कुठेही जीवीतहानी होऊ नये यासाठी शासन काळजी घेत आहे. बळीराजा पावसामुळे सुखावतोय. तथापी यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकार कटिबद्द राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले.
Join Our WhatsApp Community